( जन्म 21 जून 1959), आजच्या पिढीतील मराठी भाषेचे ख्यातनाम कवी, संशोधक, समीक्षक, व नाट्यकार म्हणून सुपरिचित. आई…… वडिल सुखदेव यांच्या पोटी चावरा या मूळ गावी कष्टकरी कुटुंबात जन्म. लहानपासून शिक्षण व वाचनाची विलक्षण आवड. शिक्षणासाठी हालअपेष्टा सहन करीत बी. ए. बी. एड आणि पुढे मराठी विषयात एम. ए. ची पदवी संपादन केली. भारत उच्च माध्यमिक विद्यालय बुलढाणा येथे 27 वर्षापासून अध्यापनाचे कार्य. लेखनासाठी वेळ मिळावा म्हणून स्वेच्छा निवृत्ती.सध्या सरस्वती नगर बुलढाणा येथे वास्तव्य. महाविद्यालयीन जीवनापासूनच साहित्य लेखनास प्रारंभ, काव्य, नाट्य, समीक्षा व संशोधन इ. वाड्:मय प्रकारात प्रामुख्याने लेखनकार्य. युगवाणी, शब्दवेध, खेळ, शब्द, अभिदानंतर, ऐवजी इ. विविध वाड्:मयीन नियतकालिकातून समीक्षा व संशोधनात्मक 22 लेख प्रसिद्ध. ‘शब्दवेध’ या वाड्:मयीन अनियतकालिकाच्या संपादनात सहभाग दिला आहे. रवींद्र इंगळे चावरेकर यांचे विविध वाड्:मयीन नियतकालिकांमधून जे वेळोवेळी वैविध्यपूर्ण लेखन प्रसिद्ध झाले त्यामध्ये त्यांनी “सिंधु कालीन भाषा लिपीचे संशोधन, सिंधुकालीन संस्कृती, वेदकालीन संस्कृतीचे वास्तव, बौद्घ संस्कृतीचे संशोधन, संत चळवळीची चिकित्सक मीमांसा, भारतीय कालगणनेची संशोधनात्मक नवी मांडणी ,गाथांचे नव अन्वयन आणि महाराष्ट्रातील सांस्कृतिक चळवळीचा वेध” घेणारे, परंतु महाराष्ट्राच्या सामाजिक व सांस्कृतिक इतिहासाला नवा आयाम देणारे लेखन केले आहे.